Advertisement

तापमानातील घट, प्रदूषणामुळं कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता

टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली

तापमानातील घट, प्रदूषणामुळं कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता
SHARES

दिवाळीनंतर मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. मात्र असं असलं तरी राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणात तितकीशी वाढ झालेली नाही. परंतू, टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली. मुंबईतील तापमानात घट झाली असून, थंडी वाढल्यास कोरोना वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. मात्र, राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.  प्रशासनानं याचं गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना चाचणीसह उपाययोजनांवर भर दिला. शिवाय 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'सारख्या अनेक उपक्रम हाती घेऊन जास्तीत जास्त सातत्यानं भर देण्यात येत आहे.

मुंबईतील २,२५० कोरोनाबाधित रुग्णांची दुहेरी नोंद बुधवारी केंद्र शासनाच्या आयसीएमआर संकेतस्थळावर करण्यात आली होती. महापालिका प्रशासनानं कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची क्षमता वाढविली असून, रुग्णांच्या सहवासितांच्या शोधावरही भर दिला आहे.

Read this story in English
संबंधित विषय