Advertisement

ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्षाची मागणी


ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्षाची मागणी
SHARES

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य उपचारासाठी सवलत दिली जाते. मात्र, तरीही त्यांच्यासाठी स्वतंत्र आरोग्य कक्ष स्थापन करण्यात यावा, अशी मागणी आता नगरसेवकांकडून होऊ लागली आहे. स्वतंत्र आरोग्य कक्ष स्थापन केल्यास ज्येष्ठ आणि वयोवृध्दांना अाणखी चांगल्या अारोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली.  मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. वृध्दापकाळामुळे अनेक जण स्मृतीभ्रंश, अर्धांगवायू व इतर अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त असतात. अशा आजारपणात त्यांच्या कुटुंबियांकडून आवश्यक तेवढं सहकार्य मिळत नाही, असं नरवणकर त्यांनी म्हटलं.


ज्येष्ठांची गैरसोय

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिक तथा वयोवृध्दांना मोफत आरोग्य सेवा व विविध आरोग्य चाचण्यांमध्ये सवलत मिळते. त्यामुळे बहुतांशी ज्येष्ठ नागरिक महापालिकेच्या रुग्णालयात औषधोपचारासाठी जातात. परंतू, महापालिका रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना सेवा सुविधा तसेच वैद्यकीय उपचार देणं हे महापालिकेच्या आवाक्याबाहेरचं होत आहे.

 त्यामुळे त्यांना उपचार व वैद्यकीय चाचणी सहगत्या उपलब्ध करून करून देण्यासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमये विशेष आणि स्वतंत्र सुविधा असणं आवश्यक आहे. सध्या ही सुविधा नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे, असं नरवणकर यांनी म्हटलं अाहे. हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठासह ७७८ महाविद्यालयांचं ऑडिट होणार!

अखेर एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी, शुक्रवारपासून प्रवाशांना भुर्दंड
Read this story in हिंदी
संबंधित विषय