Advertisement

'कोरोना पुर्णपणे जाईल तेव्हाच १०० टक्के निर्बंध निघतील' - आदित्य ठाकरे

'१०० टक्के निर्बंध तेव्हाच निघून जातील जेव्हा कोरोना आपल्यातून पुर्णपणे जाईल', असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

'कोरोना पुर्णपणे जाईल तेव्हाच १०० टक्के निर्बंध निघतील' - आदित्य ठाकरे
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लावण्यात आलेले निर्बंध लवकरच हटवण्यात येणार असून मुंबई पुन्हा १०० टक्के अनलॉक होणार आहे. यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी '१०० टक्के निर्बंध तेव्हाच निघून जातील जेव्हा कोरोना आपल्यातून पुर्णपणे जाईल', असं म्हटलं.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीला लागून असलेल्या नव्या व्हिविंग गॅलरीचे उद्धाटन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतना त्यांनी कोरोनाच्या निर्बंधाबाबत माहिती दिली.


''१०० टक्के निर्बंध तेव्हाच निघून जातील जेव्हा कोरोना आपल्यातून पुर्णपणे जाईल. आपण पाहत असाल अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. काळजीपुर्वक पुढे चाललो आहे. शाळा, कॉलेज, ऑफिसेस सुरू आहेत. रेस्ट्रॉंरंटवरील वेळेचे निर्बंध ही कमी करण्यात आले. पण महत्वाचं म्हणजे मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. तसंच, कोरोनाचा अंत झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) सांगितलं जात नाही तोपर्यंत  काळजी घ्यावी लागेल'', असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

'फेब्रुवारीच्या अखेरीस मुंबई अनलॉक होईल. परंतु, लोकांनी मास्क घालणं तसंच सामाजिक अंतर पाळणं महत्वाचे आहे. अधिकारी यासाठी सज्ज आहेत', असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा