Advertisement

राज्यात मिनी लॉकडाउन?; रात्री जाहीर होणार नियमावली

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकार सतर्क झालं असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात मिनी लॉकडाउन?; रात्री जाहीर होणार नियमावली
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकार सतर्क झालं असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक महत्वाची बैठक पार पडली. सकाळी ९ वाजता तातडीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचा टास्क फोर्सकडून आढावा घेतला.

राज्यात आधीच निर्बंध लावले असताना रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार आहे. त्यानतंर मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावायचे यासंबंधी निर्णय घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री यासंबंधी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात तूर्तास लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक केले जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक कंबरडं मोडलं असताना आणि राज्याची आर्थिक स्थिती पाहता लॉकडाउन लावण्याचा सरकारचा विचार नाही अशी माहिती मिळत आहे. मात्र यावेळी मिनी लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा