Advertisement

मुंबईतील गोठे हद्दपार होणार

राज्य सरकारनेही महापालिकेकडे पत्रव्यवहार करून, आमच्या अखत्यारितील जागांवरील गोठे हटविणे शक्य नसून महापालिकेने त्याविरोधात कारवाई करावी, असे गेल्या वर्षी स्पष्ट केले होते.

मुंबईतील गोठे हद्दपार होणार
SHARES

मुंबईत (mumbai) मोठ्या प्रमाणात असलेले गाई, म्हशींचे गोठे हद्दपार करण्यासाठी वर्षभरापूर्वी मुंबई महापालिकेने प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, गोठ्यांशी संबंधित संघटनांनी न्यायालयात धाव घेतली.

परंतु न्यायालयाने (bombay high court) कारवाई करण्यासाठी महापालिकेला (bmc) आदेश दिल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी यासंदर्भात पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

यामुळे शहरातील गोठे (stable) पालघर जिल्ह्यातील दापचेरी येथे स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत 2005 पूर्वी गोठ्यांना परवाने मिळत होते. नंतर मुंबई गोठेमुक्त करण्याचा निर्णय झाला.

यासंदर्भात संबंधित संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, शहरात गोठे नकोत, अशी भूमिका उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतली. बहुतांश गोठे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील जागांवर आहेत. त्यामुळे या जागा रिकाम्या करण्यासाठी राज्यस्तरावर तसेच महापालिकेकडूनही प्रयत्न होत होते.

राज्य सरकारनेही महापालिकेकडे पत्रव्यवहार करून, आमच्या अखत्यारितील जागांवरील गोठे हटविणे शक्य नसून महापालिकेने त्याविरोधात कारवाई करावी, असे गेल्या वर्षी स्पष्ट केले होते.

त्यामुळे महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) गोठे हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सध्या मुंबईत 263 गोठे आहेत. यामध्ये परवानाधारक 59 तर विनापरवाना 204 गोठे आहेत. या सर्व गोठ्यांना महापालिकेने नोटीसही बजावण्यास सुरुवात केली होती.

मात्र, त्यास मुंबई मिल्क प्रोड्युसर असोसिएशन सह अन्य संघटनांनीही विरोध केला. तसेच न्यायालयातही हे प्रकरण गेले. या संदर्भात 15 जुलैला निर्णय देत न्यायालयाने मुंबई महापालिकेने यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार महापालिकेकडून न्यायालयाचा निर्णय व सर्व कायदेशीर बाबीही तपासून तबेल्यांचे स्थलांतर कसे करता येईल, त्यातील कायदेशीर बाबी, अडचणी, तबेले मालकांना पुन्हा पाठवण्यात येणाऱ्या नोटीस इत्यादीची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. शहरातील गोठ्यांमध्ये 9 हजार 959 गाई-म्हशी आहेत.



हेही वाचा

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा

मानखुर्दमध्ये भूमिगत मिनी-पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा