मध्य रेल्वे (CR) 6 नोव्हेंबर 2023 पासून नॉन-एसी सेवा बदलून 10 एसी लोकल सेवा सुरू करणार आहे. या 10 एसी सेवांपैकी, 1 AC Local सकाळी आणि 1 संध्याकाळी पीक अवर्समध्ये धावेल.
या एसी लोकल सोमवार ते शनिवार या कालावधीत धावतील आणि रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी धावणार नाहीत.
जाणून घ्या वेळापत्रक
➡ CSMT स्लो लोकल कल्याणहून 07.16 वाजता सुटते आणि 8.45 वाजता CSMT ला पोहोचते.
➡ कल्याण स्लो लोकल सीएसएमटीहून 08.49 वाजता सुटते आणि 10.18 वाजता कल्याणला पोहोचते.
➡ CSMT स्लो लोकल कल्याणहून 10.25 वाजता सुटते आणि 11.54 वाजता CSMT ला पोहोचते.
➡ अंबरनाथ धीमी लोकल CSMT वरून 11.58 वाजता सुटते आणि अंबरनाथला 13.44 वाजता पोहोचते.
➡ CSMT स्लो लोकल अंबरनाथहून 14.00 वाजता सुटते आणि 15.47 वाजता CSMT ला पोहोचते.
➡ डोंबिवली धीमी लोकल CSMT वरून 16.01 वाजता सुटते आणि 17.20 वाजता डोंबिवलीला पोहोचते.
➡ परळ धीमी लोकल डोंबिवलीहून 17.32 वाजता सुटते आणि 18.38 वाजता परळला पोहोचते.
➡ कल्याण स्लो लोकल परळहून 18.40 वाजता सुटते आणि 19.54 वाजता कल्याणला पोहोचते.
➡ परळ स्लो लोकल कल्याणहून 20.10 वाजता सुटते आणि 21.25 वाजता परळला पोहोचते.
➡ कल्याण स्लो लोकल परळहून 21.39 वाजता सुटते आणि 22.53 वाजता कल्याणला पोहोचते.
यासह एकूण एसी लोकल सेवांची संख्या सध्याच्या ५६ एसी सेवांवरून दररोज ६६ होईल. सीआरच्या मुंबई विभागातील उपनगरीय सेवांची एकूण संख्या 1810 राहील.