Advertisement

मध्य रेल्वेकडून 38 तासांच्या ब्लॉकची घोषणा, नवे टाईमटेबल पहा

मध्य रेल्वेकडून मोठ्या ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेकडून 38 तासांच्या ब्लॉकची घोषणा, नवे टाईमटेबल पहा
SHARES

मध्य रेल्वेकडून मोठ्या ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. हा ब्लॉक तब्बल 38 तासांसाठी असणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर हा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

पनवेल उपनगरीय यार्डच्या पुनर्निर्माण कामासाठी, पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईनच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यादरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे हार्बर तसंच ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडणं फायद्याचं ठरणार आहे. 

बेलापूर ते पनवेल तसंच ट्रान्स हार्बर लाईनवर अप आणि डाऊन मार्गावर एकही ट्रेन धावणार नाही. 30 तारखेला म्हणजेच शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोरपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. 

ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत. तसंच हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांपर्यंत असेल आणि तेथूनच ट्रेन सेवा सुरू होईल.

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल शनिवारी रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी सीएसएमटीहून सुटेल. ही ट्रेन 10 वाजून 22 मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. 

शेवटची लोकल कधी सुटणार?

  • अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ही लोकल 11 वाजून 54 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.
  • ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे स्थानकातून रात्री 9 वाजून 36 मिनिटांनी सुटेल आणि 10 वाजून 28 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.
  • अप ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल 9 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि 10 वाजून 12 मिनिटांनी ठाण्याला पोहोचेल.

पहिली लोकल कधी?

  • ब्लॉकनंतर म्हणजेच 2 ऑक्टोबरला सीएसएमटीहून पनवेलसाठी पहिली लोकल 12 वाजून 8 मिनिटांनी सुटेल. ही लोकल 1 वाजून 29 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.
  • सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल पनवेलहून 1 वाजून 37 मिनिटांनी सुटेल. ही लोकल 2 वाजून 56 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.
  • ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल 1 वाजून 24 मिनिटांनी सुटेल. 2 वाजून 16 मिनिटांनी लोकल पनवेलला पोहोचेल.

तथापि, यामुळे, या रविवारी, 1 ऑक्टोबर 2023 रोजी मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर लाईन आणि बीएसयू लाईन उपनगरीय विभागांसह CSMT-कल्याण विभागाच्या मुख्य मार्गावर आणि CSMT-पनवेल हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही.


हेही वाचा

मध्य रेल्वेवर आता असणार हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे

ओव्हरहेड वायर तपासणीचे काम काही मिनिटांत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा