मध्य रेल्वेचा (central railway) मुंबई (mumbai) विभाग ऑगस्टपासून आपल्या वेळापत्रकात बदल करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील गर्दी कमी करणे आणि लोकल ट्रेन सेवा सुधारणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
सध्या सीएसएमटी इथून सुरू होणाऱ्या पाच जलद लोकल गाड्या आता दादर स्थानकावरून सुटतील. या जलद लोकल सेवा दादरवरून सोडल्यास प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरेल.
कारण संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी दादरहून लोकलमध्ये चढणे आव्हानात्मक होते. सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये भायखळ्याला पोहोचल्यावर गर्दी होते. त्यामुळे दादर स्थानकावरील प्रवाशांना गाडीमध्ये चढणे अशक्य होते.
मध्य रेल्वेने (CR) सध्या ठाण्यापर्यंत लोकल गाड्यांच्या फेऱ्या कल्याणपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली येथील प्रवाशांनी केलेल्या विनंतीनंतर ही बाब समोर आली आहे. या बदलामुळे त्या स्थानकातील प्रवाशांना थेट सेवा मिळेल.
याशिवाय, एक अतिरिक्त जलद लोकल (mumbai local) मुंब्रा आणि कळवा येथे थांबेल. सूत्रांनी सूचित केले आहे की हे बदल ऑगस्टच्या सुरुवातीला नवीन वेळापत्रकात केले जातील.
हेही वाचा