
मध्य रेल्वे (central railway) ख्रिसमस (Christmas)/नवीन वर्ष (New Year) आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई (mumbai)-करमाळी/नागपूर (nagpur)/मंगळूर/तिरुवनंतपुरम हिवाळी विशेष गाड्या (festive special trains) चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
1. सीएसएमटी-करमाळी-सीएसएमटी दैनिक विशेष - 36 फेऱ्या
01151 दैनिक विशेष गाडी 19.12.2025 ते 05.01.2026 पर्यंत दररोज सीएसएमटीहून 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. (18 फेऱ्या)
01152 दैनिक विशेष गाडी 19.12.2025 ते 05.01.2026 पर्यंत दररोज करमाळीहून 14.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. (18 फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम
रचना: 2 एसी- 2 टायर, 8 एसी-3 टायर, 6 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.
2. एलटीटी- तिरुवनंतपुरम नॉर्थ-एलटीटी साप्ताहिक विशेष - 8 फेऱ्या
01171 साप्ताहिक विशेष गाडी 18.12.2025 ते 08.01.2026 पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून 16.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.30 वाजता तिरुवनंतपुरम नॉर्थ येथे पोहोचेल. (4 फेऱ्या)
01172 साप्ताहिक विशेष गाडी 20.12.2025 ते 10.01.2026 पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम नॉर्थहून 16.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 01.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (4 फेऱ्या)
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकंबिका रोड, कुंडल, सुरेंद्र रोड, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चांगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, करुणागपल्ली, सस्थानकोट्टा, कोल्लम आणि वर्कला शिवगीरी
रचना: 1 एसी-2 टियर, सिक्स एसी-3 टियर, 9 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
3. LTT- मंगळुरू Jn-LTT साप्ताहिक विशेष - 8 सेवा
01185 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी 16.00 वाजता 16.12.2025 ते 06.01.2026 पर्यंत सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.05 वाजता मंगळुरू जक्शनला पोहोचेल. (4 फेऱ्या)
01186 साप्ताहिक स्पेशल मंगळुरू जंक्शन 17.12.2025 ते 07.01.2026 पर्यंत दर बुधवारी 13.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (4 फेऱ्या)
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकंबिका रोड, कुंडल.
रचना: 1 एसी फर्स्ट क्लास, 3 एसी- 2 टायर, 15 एसी-3 टायर, 1 पॅन्ट्री कार, 1 जनरल सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 2 जनरेटर व्हॅन.
4. सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाड्या - ६ फेऱ्या
01005 साप्ताहिक विशेष गाडी 20.12.2025 ते 03.01.2026 पर्यंत दर शनिवारी 00.30 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी 15.30 वाजता नागपूरला पोहोचेल (3 फेऱ्या)
01006 साप्ताहिक विशेष गाडी 20.12.2025 ते 03.01.2026 पर्यंत दर शनिवारी 18.10 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.25 वाजता सीएसएमटीला पोहोचेल (3 फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
रचना: 2 एसी-2 टायर, 8 एसी-3 टायर, 6 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.
अनारक्षित डब्यांची तिकिटे यूटीएस (UTS) द्वारे सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य दरांवर बुक केली जाऊ शकतात.
या विशेष गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
हेही वाचा
