नाईक गँगचे तिघे अटकेत

 Girgaon
नाईक गँगचे तिघे अटकेत

गिरगाव - गँगस्टर अश्विन नाईकच्या गँगच्या तीन साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदानंद सावंत, अमरसिंग वाघ आणि नितीन सोनावणे अशी या तिघांची नावं आहेत. चोरी करताना या तिघांना व्ही. पी. रोड पोलिसांनी रंगेहात पकडले.

5 सप्टेंबरला या तिघांनी कांदेवाडी येथे राहणाऱ्या पद्मा शेनाई या वृद्ध महिलेच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडा ओरड ऐकून तेथे आलेल्या माणसांनी तेथे धाव घेत या चोरट्यांपैकी नितीन सोनावणेला पकडले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सोनावणेला अटक केली. पुढे त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सदानंद सावंत, अमरसिंग वाघ आणि त्यांना मदत करणारा शेनाई यांचा केअर टेकर राकेश शहा यांना अटक केली.

Loading Comments