Advertisement

मुंबईच्या बीकेसी कोव्हिड सेंटर इथं लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी


मुंबईच्या बीकेसी कोव्हिड सेंटर इथं लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी
SHARES

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला असून, दिवसेंदिवस बधितांची संख्या अधिक वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनानं कडक निर्बंध लावत लसीकरणही वाढवलं आहे. मुंबईतील लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेकदा लसीकरणावेळी सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या बीकेसी येथील कोव्हिड सेंटर इथं घडला आहे.

गुरुवारी लसीकरणावेळी बीकेसी इथं नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करत गर्दी न करण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही नागरिक बेफिकीर असल्याचं समजतं.

मुंबईत सध्या लसीकरणाचा तुटवढा निर्माण झाला आहे. केवळ ५ हजार लसींचा साठा ऊपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे हा साठा आजच्या दिवसापूर्ताच शिल्लक आहे. शिवाय, ऊद्या जर स्टाॅक आला नाही तर लसीकरणावर होणार परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील बीकेसी कोविड सेंटर हे सगळ्यात मोठं जंबो कोवीड सेंटर आहे. कोरोना वाढतोय, आधी २०० बेड फिल होते, आत्ता १ हजार बेड फिल झाले आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा