मालमत्ता कर (property tax) थकवणाऱ्या मोठ्या आस्थापना, माॅल्सवर मुंबई महापालिकने (Mumbai Municipal Corporation) कठोर कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदारांच्या महागड्या वस्तूच पालिकेचे कर्मचारी जप्त करत आहेत. त्यामुळे या थकबाकीदारांनी कर भरण्यास सुरूवात केली आहे. वांद्रेमधील क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉल (Crystal Paradise Shoppers Mall) आणि अंधेरी पश्चिमच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील (Lakshmi Industrial Estate) मालमत्ता कर थकवणाऱ्या गाळेधारकांवर बुधवारी पालिकेने कारवाई केली. कारवाईच करतात या थकबाकीदारांनी तब्बल २ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला.
आर्थिक वर्ष संपत आले तरी मालमत्ता कराची (property tax) अपेक्षित वसुली न झाल्याने पालिका थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई करत आहे. कर थकवणाऱ्यांच्या वस्तूही पालिकेने जप्त केल्या आहेत. आता पालिकेने (Mumbai Municipal Corporation) मालमत्तांवर अटकावणीची कारवाई सुरू केली आहे. ३ हजार ५६४ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई पालिकेने केली आहे. क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉलमधील गाळेधारकांनी ४ कोटी ८ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला होता. तर लक्ष्मी प्लाझा या गाळेधारकाकडं २५ लाखांचा कर थकीत आहे. बुधवारी पालिकेने त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर क्रिस्टल मॉलमधील १६७ गाळेधारकांनी १ कोटी ७८ लाखांचे धनादेश पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. तर लक्ष्मी प्लाझाच्या मालकानेही २५ लाखांपैकी साडेबारा लाखांचा धनादेश दिला. उर्वरित रक्कमही लवकरच भरण्याची हमी त्यांनी दिली़
मालमत्ता कराची (property tax) वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पालिकेचे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ५५०० कोटींचा मालमत्ता कर मिळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ३१५४ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतला आहे. यापूर्वी पालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या २६२ मालमत्तांची जलजोडणी तोडली आहे.
हेही वाचा -