संतापजनक! नोकरीचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार

अटक आरोपीची पीडित महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती.

संतापजनक! नोकरीचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार
SHARES

नोकरीचे आमीष दाखवून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना कांदिवलीच्या समतानगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी पंकज विरेंद्र राय (२६) वर्षीय तरुणाला अटक केली आहे.  अटक आरोपीची पीडित महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती. 

हेही वाचाः- या भीतीने उद्धव ठाकरे 'मातोश्री' सोडून 'वर्षा' बंगल्यावर जाणार नाहीत

 कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय पीडित महिलेची ३ वर्षापूर्वी आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. राय हा अंधेरीत रहात असून त्याने पीडितेला तो एका खासगी कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला असल्याचे सांगितले होते. पीडितेला नोकरीची गरज असल्यामुळे जुलै २०१८ मध्ये तिने त्याच्याशी संपर्क साधला. पीडितेचा गैरफायदा घेण्यासाठी राय तिच्याशी वारंवार संपर्कात राहू लागला. यातूनच त्याने महिलेशी जवळीकता साधून तिला नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून तिला भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केलेच त्याच बरोबर तिला मारहाण ही केली. तसेच याबाबतची माहिती कुणाला दिल्यास अॅडिस हल्ला करण्याची धमकी दिली. 

हेही वाचाः-कुख्यात गुंडाच्या आईला खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक

त्यानंतर दररोज आरोपी पीडितेला धमकावून शरीर सुखाची मागणी करायचा. रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने अखेर राॅय विरोधात समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी राॅय विरोधात ३७६, ३७७, ३२३,३२४,५०६(२),५०४ भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस अधिक तपास करत आहेत. मुंबईत मागील वर्षात १०१५ महिलांवर बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ९३१ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या तुलनेत २०१८ मध्ये ८८९ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून ८३३ गुन्ह्यांत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा