Advertisement

CSMT-Uran रेल्वे मार्ग मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास खारकोपर ते उरणदरम्यान लोकलची चाचणी घेण्यात आली.

CSMT-Uran रेल्वे मार्ग मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता
SHARES

गेल्या २५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली उरण लोकल लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास खारकोपर ते उरणदरम्यान लोकलची चाचणी घेण्यात आली.

गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता आणि शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक चाचणी करणारी गाडी उरण स्थानकात आली होती.

खारकोपर ते उरणदरम्यानच्या सिग्नल यंत्रणेचीही चाचणी घेण्यात आली असून एक इन्स्पेक्शन कार आणि बलाक रेग्युलेटिंग मशिन उरण स्थानकात दाखल झाले आहे.

उरण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर असलेले उरण गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून लोकलच्या प्रतीक्षेत आहे. नवी मुंबईचा विकास झाल्यानंतर उरणला लोकल येणार, अशी अपेक्षा होती. मात्र, वनविभागाच्या खारफुटीच्या प्रश्नामुळे ही लोकल अनेक वर्षे रखडली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून उरण ते नवी मुंबईचा प्रवास हा एसटी, एनएमएमटी, खासगी वाहनांनी करावा लागत असून रस्त्यावरील खड्डे आणि कोंडीला सामोरे जावे लागत होते. 

आता उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्थानकाच्या कामाला गती देण्यात आली असून मार्चअखेरपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा