Advertisement

विक्रोळीतील कन्नमवारनगर सांस्कृतिक कलाभवनाचा भाग कोसळला


विक्रोळीतील कन्नमवारनगर सांस्कृतिक कलाभवनाचा भाग कोसळला
SHARES

विक्रोळी कन्नमवारनगर येथील सांस्कृतिक कलाभवनाची दुरूस्ती सुरू असताना रविवारी कलाभवनाचा काही भाग अचानक कोसळला. यात ७ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते.  पण त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आलं आहे. यातील 2 कामगार जखमी झाले आहेत. 


जीर्ण आणि धोकादायक 

कन्नमवारनगर वसाहतीची दुरावस्था झाली असून याच वसाहतीतील कन्नमवारनगर २ या उत्कर्ष शाळेसमोरील इमारतीत हे सांस्कृतिक कलाभवन आहे. हेकलाभवन शाहीर विठ्ठल उमप यांना राज्य सरकारकडून कलाजोपासनेसाठी दिलं होतं. त्यानुसार इथं विठ्ठल उमप गाण्याचा, संगीताच सराव करायचे. मात्र, ही इमारत गेल्या काही वर्षापासून जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. 


जिवितहानी नाही

धोकादायक अशा या कलाभवनाची दुरूस्ती सुरू होती. दुरूस्तीदरम्यान सकाळी पावणे अकराच्या सुमारास कलाभवनाचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलानं त्वरीत ढिगाऱ्याखाली अ़डकलेल्या सात जणांना सुखरूपणे बाहेर काढलं आहे. सुदैवानं यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, दोघे जखमी झाले अाहेत. अमिरूल हसन (२३) आणि अशोक घोडे (६०) अशी जखमींची नावं असून त्यांना आंबेडकर हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

१०२ वर्षे जुना पत्रीपुल इतिहासजमा, पुलाच्या पाडकामाला सुरूवात

...अन्यथा दहा दिवसांनंतर पाणी न पिता आमरण उपोषण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा