Advertisement

'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत होणार, मंत्री मुनगंटीवारांची घोषणा

कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे.

'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत होणार, मंत्री मुनगंटीवारांची घोषणा
SHARES

महाराष्ट्राचे प्रतिभावंत शाहीर साबळे यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. हे गीत राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गीत असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्रा राज्याचाही समावेश होऊ शकतो असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे कौतुक होईल. या विषयावर चर्चा करण्यासाठी मागील महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. मूळ गीताची लांबी जास्त असल्यामुळे या गीतामधील फक्त पहिली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्यावर एकमत झाले आहे."

सद्यस्थितीत देशातील केवळ 11 राज्यांचेच स्वत:चे असे गाणे आहे. यात आता महाराष्ट्र राज्याचेही स्वत:चे गीत असेल.

महाराष्ट्राचे अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिले असून श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे.

2015 मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

मुनगंटीवार म्हणाले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत कार्यक्रमांच्या सुरुवातीला गायले जाईल. ते 1.15 ते 1.30 मिनिटांमध्ये बसेल असे या गाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान भारताच्या राष्ट्रगीताची वेळ देखील 52 सेकंद आहे. या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा