Advertisement

मुंबईकरांचं पिण्याच्या पाण्याचं टेन्शन दूर, एप्रिल २०२२ पर्यंत पुरणार पाणी

तलावांमध्ये १४ जुलैनंतर ६८५८१४ दशलक्ष लिटर्स म्हणजेच २२० दिवसांचे पाणी जमा झाले आहे

मुंबईकरांचं पिण्याच्या पाण्याचं टेन्शन दूर, एप्रिल २०२२ पर्यंत पुरणार पाणी
SHARES

धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्याने मुंबईकरांना एप्रिल २०२२ पर्यंत पिण्याच्या पाण्याचं टेन्शन नसणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांत ९,३६,९३३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  हा पाणीसाठा एप्रिल २०२२ पर्यंत पुरेल. तलावांमध्ये गेल्या दोन वर्षांतील रेकॉर्ड मोडत सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांतून रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने ओढ दिल्याने तलावांमध्ये केवळ १८ टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे पालिकेने पाणीकपातीचे संकेतही दिले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून तलावक्षेत्रात होणार्‍या जोरदार पावसामुळे तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. 

तलावांमध्ये १४ जुलैनंतर ६८५८१४ दशलक्ष लिटर्स म्हणजेच २२० दिवसांचे पाणी जमा झाले आहे. पाणीपुरवठा करणार्‍या तलावांतील सातपैकी चार तलाव याआधीच ओव्हर फ्लो झाले आहेत.


तलाव          पाणी (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा – ८५२२८

मोडकसागर – १२८९२५

तानसा – १४३४१६

मध्य वैतरणा – ११३३११

भातसा – ४३०३०९

विहार – २७६९८

तुळशी – ८०४६

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा