Advertisement

दहिहंडी समन्वयक समिती लंडनला

मुंबईतील गोविंदाचा थरार हा देशाबाहेरील लोकांनाही भावल्याने २००३ साली 'स्पेन' मधील 'कोक्युर्स दे कॅस्टल' या फेस्टीव्हलमध्ये पहिल्यांदा भारताबाहेर दहिहंडी समन्वयक समितीने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

दहिहंडी समन्वयक समिती लंडनला
SHARES

दहिहंडी या सणाचा मुंबईत भलताच बोलबाला आहे. एरव्ही एकमेकांचे पाय खेचणारे तरून या उत्सवात मात्र एकमेकांना आधार देत मानवी मनोरे रचून सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. याची दखल ही परदेशातील ही देशांनी घेतलेली आहे. याच सणाला अलिकडे खेळाचं रूप मिळाल्याने महाराष्ट्राच्या सुपुत्रांना साता-समुद्रापार मानवी मनोरे रचण्यामागची शौली आणि त्याचे प्रात्याक्षिक अभ्यासण्यासाठी लंडनहून बोलावणे आले आहे.


 २००३ मध्ये स्पेनकडून बोलावणं

दहिहंडीला अलिकडे खेळाचं रूप मिळालं असल्याने, मुंबईतील दहिहंडी उत्सव जगभर पोहचला आहे. मुंबईतील हाच दहिहंडी उत्सव टिकावा, त्याचबरोबर सर्व गोविंदा पथकांना न्याय मिळावा यासाठी गेली अनेक वर्ष मुंबई दहिहंडी  समन्वयक समिती काम करत आहे. मुंबईतील गोविंदाचा थरार हा देशाबाहेरील लोकांनाही भावल्याने २००३ साली 'स्पेन' मधील 'कोक्युर्स दे कॅस्टल' या फेस्टीव्हलमध्ये पहिल्यांदा भारताबाहेर दहिहंडी  समन्वयक समितीने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर २०१८ साली 'स्पेन' मधून पुन्हा बोलावणं आलं होतं.


लंडनमध्ये आमंत्रण

मुंबईतील गोविंदाच्या प्रेमात फक्त स्पेनच पडले नसून आता लंडन मधील 'मार्गारेट फेस्टीव्हल' मध्येही मुंबई दहिहंडी समन्वयक समितीला विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. या उत्सवात आशिया खंडातुन भारताच्या वतीने मुंबई दहिहंडी समन्वयक समितीलाच या उत्सवासाठी खास विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले आले.


१२ जणांची टीम

मुंबई दहिहंडी समन्वयक समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांच्या नेतृत्वात गुरूवारी सकाळी १२ जणांची टीम या सोहळ्यासाठी रवाना होणार आहे. महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या फेस्टीव्हलसाठी आशिया खंडातुन जाणारी ही पहिलीच टीम आहे.



हेही वाचा -

आम्ही मध्य रेल्वेला पावसाचा इशारा दिलाच नव्हता- हवामान खातं

पश्चिम रेल्वे पुलांच्या बांधकामावेळी करणार कार्बनचा वापर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा