Advertisement

तबेल्यांचं अस्तित्व धोक्यात


SHARES

जोगेश्वरी - एकीकडे मुंबई स्मार्ट सिटी बनत चालली आहे. इथं उंच-उंच इमारती उभारल्या जात आहेत. मात्र अजूनही मुंबईत काही ठिकाणी तबेले आहेत. पण मुंबईच्या विकासासाठी या तबेल्यांना मुंबईबाहेर नेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. असं असतानाही मुंबईत काही ठिकाणी तबेले चालवले जात आहेत. ज्या ठिकाणी हे तबेले हलवण्यात आलेत त्या ठिकाणी जाण्यास तबेला मालकांनी नकार दिला आहे. जोगेश्वरी (प.) इथले मुश्ताक मलकान या तबेला मालकानं सांगितलं की, ज्या ठिकाणी तबेले उपलब्ध करून दिलेत ते शहरापासून खूपच लांब आहेत. त्यामुळे त्याचा व्यवसायावरही परिणाम होईल.

मुंबईत 2005 मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यात एक म्हैस मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर मुंबईत तबेले ठेवण्याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर 2006 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तबेले मुंबई बाहेर हलवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही अनेक तबेले मालकांनी मुंबई बाहेर जाण्यास नकार दिला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा