गॅस पाइपलाइनच्या गळतीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम

    मुंबई  -  

    दिंडोशी - परिसरातील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालाड पुलाच्या हाइवेजवळ 'महानगर'ची गॅस पाइपलाइन लीक झाली आहे. त्यामुळे दुपारपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरु आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र दिंडोशी पोलीस आणि महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यामध्ये आता नुकसान टाळण्यासाठी मालाडहून कांदिवलीच्या दिशेने असलेल्या वाहतुकीसाठीचा पूल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली असून मुंबईकर त्रस्त झाले आहेत. तसेच पाइपलाइनमधून होणारी गळती थांबवण्याचा प्रयत्न अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.