Advertisement

गिरगाव चौपाटीवर आढळला मृतावस्थेतला डाॅल्फिन


गिरगाव चौपाटीवर आढळला मृतावस्थेतला डाॅल्फिन
SHARES

गेल्या महिनाभरापासून मुंबईच्या किनारपट्ट्यांवर मृतावस्थेतील डाॅल्फिन आढळण्याच्या घटना सातत्यानं घडतं आहेत. याआधी वांद्रे पश्चिम येथील चिंबई किनारपट्टीवर मृतावस्थेतला डाॅल्फिन आढळला. त्यानंतर वांद्रे पश्चिम, बॅण्ड स्टॅण्डवरही ४ फुटापेक्षा मोठा डाॅल्फिन मृतावस्थेत आढळला. आता शुक्रवारी दुपारी गिरगाव चौपाटी इथं एक भला मोठा मृत डाॅल्फिन आढळल्याची माहिती मुंबई कांदळवन कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


परळ रूग्णालयात शवविच्छेदन

दुपारी साडेतीनच्या दरम्यान कांदळवन कक्षाला गिरगाव चौपाटी इथं मृतावस्थेत डाॅल्फिन आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई करत या डाॅल्फिनला परळच्या प्राणी रूग्णालयात नेलं आहे. सध्या डाॅल्फिनचं शवविच्छेदन सुरू आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच नेमका कशामुळे डाॅल्फिनचा मृत झाला हे स्पष्ट होईल, असं  अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.


भांडूप इथं गाडणार

हा डाॅल्फिन ८ फुटांचा असून त्याचं वजन ५० किलोहून अधिक असल्याचं समजतं. त्यामुळं हा वजनदार मृत डाॅल्फिन उचलण्यासाठी पालिका आणि कांदळवण कक्षाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. बांबूची तिरडी तयार करत त्यावर ठेवून या डाॅल्फिनला उचलून नेलं. शनिवारी हा मृत डाॅल्फिन भांडूप इथल्या कांदळवण कक्षाच्या अखत्यारीतील जागेत गाडण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा -

हिंसक आंदोलन थांबवल्यावरच आरक्षणावर विचार- नारायण राणे

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, धनंजय मुंडेचं मुख्यमंत्र्यांना पत्र



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा