Advertisement

जिवंत व्यक्तीला ठाणे पालिकेने दिला मृत्यूचा दाखला

ठाण्यातील एका जिवंत शिक्षकाला त्याच्याच मृत्यूचा दाखला घेण्यासाठी महापालिकेने बोलावण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जिवंत व्यक्तीला ठाणे पालिकेने दिला मृत्यूचा दाखला
(Image: ANI)
SHARES

ठाण्यातील एका जिवंत शिक्षकाला त्याच्याच मृत्यूचा दाखला घेण्यासाठी महापालिकेने बोलावण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आणखी काही नागरिकांना पालिकेकडून अशा प्रकारे कॉल आल्याचंही समोर आलं आहे. 

घोडबंदर येथील मानपाडा भागात चंद्रशेखर देसाई (५५) हे राहतात. ते मुंबईतील एका शाळेत शिक्षक आहेत. चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट २०२० रोजी कोरोनाची लागण झाली होती.  होम क्वॉरन्टाईन राहून घरीच उपचार करुन देसाई बरे झाले होते. देसाई यांना मंगळवारी ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर घरच्या पत्त्याची विचारपूस या महिलेने केली.

ठाणे पालिकेतील महिलेने चंद्रशेखर देसाई हे कधी मृत झाले ? आम्हाला नोंद करायची आहे असं सांगून त्यानंतर त्यांना त्यांच्याच मृत्यूचा दाखला घेण्यासाठी बोलावले. महिलेचे हे ऐकून देसाई यांनी मी जिवंत असल्याचं महिलेला सांगितले.

त्यानंतर चंद्रशेखर देसाई यांनी त्वरित महापालिकेत धाव घेत आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मी जिवंत असून मला मृत घोषित केल्याचा प्रकार माझ्यासोबत घडला असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तांत्रिक कारणामुळे चुकीचा गैरसमज झाला आहे. कोरोना रुंग्णांची यादी पुणे आरोग्य विभागातून प्राप्त होत असल्याने अशी चूक झाली असावी. रुग्ण बाधित झाल्यानंतर बरा होईपर्यंत महापालिका पाठपुरावा करत असते. त्यानंतर कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का अशी देखील विचारपूस करण्यात येते. मात्र असा फोन गेला असल्याने पुन्हा अशी चूक होणार नाही असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे.



हेही वाचा-

जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज

बापरे! लसीकरण शिबिरांत सलाइन वॉटरचा वापर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा