देशभरात लहान मुलींसोबत अत्याचारांच्या घटना सातत्याने उघडकीस येत असताना शनिवारी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता १२ वर्षांखालील लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोषीला थेट फाशीची शिक्षा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कॅबिनेट बैठक झाली. २ तास झालेल्या या बैठकीत पाॅक्सो अॅक्टमध्ये बदल करून त्यात फाशीच्या शिक्षेचा समावेश करण्याला मंजूरी देण्यात आली.
कॅबिनेट बैठकीत मोदी सरकारने अल्पवयीन मुलींना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमा (पाॅक्सो अॅक्ट) त संशोधन करून दोषीला फाशी देण्यावर शिक्कामोर्तब केलं.
सध्या पाॅक्सो कायद्यातील तरतुदीनुसार दोषींना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे. तर कमीत कमी ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कठुआ आणि उन्नाव घटनांच्या पार्श्वभूमीवर देशभरातून या कायद्यातील तरतूदी कडक करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा-
मुंबईही कठुआच्या वाटेवर..? रोज २ महिलांवर बलात्कार
...तर मी जल्लाद व्हायलाही तयार- आनंद महिंद्रा