Advertisement

दुचाकी खरेदी करताना कंपनीकडूनच हेल्मेट, जाणून घ्या नवीन आदेश

मुंबई वाहतूक विभागाने हेल्मेट संदर्भात नीवन आवाहन केलं आहे.

दुचाकी खरेदी करताना कंपनीकडूनच हेल्मेट, जाणून घ्या नवीन आदेश
SHARES

मुंबई वाहतूक विभागाने १० जूनपासून दुचाकीवर बसलेल्या दोन्ही प्रवाशांसाठी (चालक आणि मगे बसलेला सहप्रवासी) हेल्मेट घालणं सक्तीचं केलं आहे. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट न वापरणाऱ्या लोकांवर वाहतूक पोलिसांनी १० जूनपासून कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र आता आगामी काळात दुचाकी खरेदी करणाऱ्यांना पोलिसांनी दिलासा देण्याचं काम केलं आहे. मुंबई वाहतूक विभागाने नवीन परिपत्रक जारी करून दुचाकी खरेदी करताना कंपनी, डीलरकडून हेल्मेट घ्या असं सांगितलं आहे. दुचाकीसोबत हेल्मेट देणं कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे.

मुंबई वाहतूक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, मुंबई शहरात मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ अन्वये दुचाकी वाहनाचा चालक आणि सह प्रवासी (Pillion Rider) यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.

तसेच केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १३८(४)(एफ) अन्वये दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्यास दुचाकी वाहन उत्पादक कंपनीने दुचाकी वाहनासोबत हेल्मेट (Protective Headgear) देणे आवश्यक आहे. त्यामुळे दुचाकी खरेदीदारांनी केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १३८(४)(एफ) नियमाप्रमाणे दुचाकी वाहन खरेदी करताना वाहन विक्रेत्यांकडून, डीलरकडून हेल्मेटची मागणी करावी.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' स्थानकावर १५ दिवस लोकल ट्रेन थांबणार नाही

मुंबई मेट्रो लाइन 2A, 7 चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा