Advertisement

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ


मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईकरांना सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो आहे. हे दुहेरी संकट म्हणजे कोरोना आणि साथीचे आजार. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आता साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. विशेषत: डेंग्यूची साथ पसरत चालली असून तापानं मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत जुलैच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपटीनं वाढल्याचं चित्र दिसून आलं आहे.

जुलैमध्ये डेंग्यूचे २८ रुग्ण होते. ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ही संख्या आता १३२ वर गेली आहे. सर्वाधिक रुग्ण डोंगरी, परळ, वांद्रे याठिकाणी आहेत. डासांची पैदास वाढणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन पालिकेने केलं. डेंग्यूच्या तुलनेत इतर आजारांचं प्रमाण काहीस कमी झालं आहे.

पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारांचा सर्वांधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असतो. या काळावधीत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असते. ही लोकं पौष्टिक आहाराचे सेवन करतात का आणि तासभराने पाणी पितात का हे पाहणं आवश्यक आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा