प्रगतीसाठी पर्यावरणाचा बळी?

मुंबई – केंद्र सरकारनं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासंदर्भात नवी अधिसूचना जारी केलीये. सरकारच्या मते या अधिसूचनेतून उद्यानाच्या संरक्षणाचाच प्रयत्न केला असला, तरी पर्यावरण तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं आहे. या उद्यानालगतच्या इको सेन्सिटिव्ह झोनची मर्यादा 10 किलोमीटर असावी, असं सुप्रिम कोर्टानं सुचवलं होतं. पण या अधिसूचनेद्वारे ही मर्यादा आता किमान 100 मीटर आणि कमाल 4 किलोमीटर प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यानाच्या सीमेलगतच मोठ्या संख्येनं बांधकामं होण्याची शक्यता आहे.

Loading Comments