Advertisement

प्रकल्पबाधित गाळेधारकांना मिळणार हवे तिथे गाळे!


प्रकल्पबाधित गाळेधारकांना मिळणार हवे तिथे गाळे!
SHARES

मुंबई शहरवासियांच्या सोयीसाठी रस्ते, मेट्रो, मोनो, पर्जन्य जलवाहिनी अशी अनेक प्रकारची विकासकामं केली जातात. अशी कामे करताना त्या ठिकाणी असणारे गाळे स्थलांतरित करावे लागतात किंवा त्यांना नुकसानभरपाई द्यावी लागते. मात्र आता अशा प्रकल्पबाधित गाळेधारकांना आर्थिक नुकसानभरपाईऐवजी हवा तिथे गाळा देण्याचे धोरण स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.


काय आहे धोरण?

एखाद्या गाळाधारकाचा गाळा विकासकामासाठीच्या प्रकल्पामध्ये गेल्यास त्याला पालिकेच्या ताब्यात असलेल्या 91 मंड्यांमध्ये कुठेही हवा तिथे गाळा मिळेल. समायोजन आरक्षणांतर्गत महापालिकेला मिळालेल्या या 91 मंड्यांचा जास्तीतजास्त गाळाधारकांकडून वापर केला जावा असा यामागे पालिकेचा हेतू आहे.


गाळाधारकांसमोर धर्मसंकट!

दरम्यान अशी निवड करताना जर गाळाधारकाने त्याच्या सध्याच्या गाळ्यापेक्षा कमी किंमतीचा गाळा निवडला, तर त्याला पालिकेकडून फरकाची रक्कम मिळणार नाही. याउलट जर गाळाधारकाने त्याच्या सध्याच्या गाळ्यापेक्षा अधिक किंमतीचा गाळा निवडला, तर मात्र त्याला फरकाची रक्कम जमा करावी लागणार आहे.

राज्य सरकारने हस्तांतरणीय विकास हक्काचे वितरण मुंबईत कुठेही करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याच धर्तीवर प्रकल्पबाधित व्यक्तीला मुंबईत कुठेही पर्यायी जागा वाटप करण्याचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये प्रकल्पबाधित व्यक्तींना जागा बदलून हवी असल्यास व त्यांना जागेचे वाटप करण्यात आल्यानंतर जर तो गाळा बदलून हवा असल्यास दोन्ही भागांमधील बाजार भावातील तफावतींचा विचार केला जाईल.


काय आहे सध्याची पद्धत?

सध्याच्या धोरणानुसार विभाग कार्यालयाकडून प्रकल्पबाधित व्यक्तीची पात्रता व वाटप करण्याचे क्षेत्रफळ ठरवण्यात येते. त्यानंतर संबंधित अतिरिक्त आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर बाजार विभागाकडे पर्यायी जागा वाटप करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्यानंतर मंडईतील गाळ्यांमध्ये गाळेधारकांचे पर्यायी पुनर्वसन केले जाते.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा