Advertisement

IPS अधिकारी देवेन भारती यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती


IPS अधिकारी देवेन भारती यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
SHARES

भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (Deven Bharati) यांची बुधवारी 'मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त' (Special Commissioner Of Mumbai Police) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) नवीन पदनिर्मिती करण्यात आली असल्याची माहिती एक अधिकाऱ्याने दिली.

राज्याच्या गृह विभागाने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच, मुंबई पोलिस दलात विशेष पोलिस आयुक्त पद सुरू केले असून IPS देवेन भारती यांची प्रथम विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

देवेन भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर काही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

  • 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.
  • वर्ष 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते.
  • त्यानंतर, त्यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती.
  • वर्ष 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर भारती यांना साईड पोस्टींग देण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली.
  • देवेन भारती यांची 13 डिसेंबर 2022 रोजी वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त असताना बदली झाली होती. त्यांची जागा राजवर्धन यांनी घेतली होती.



हेही वाचा

महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी

आता अॅपद्वारे होणार म्हाडाच्या लॉटरीची नोंदणी, अर्जदारांना 'हे' दोन पर्याय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा