Advertisement

सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा 'अनुवाद पुरस्कार'

ज्येष्ठ साहित्यिका सई परांजपे यांना ‘साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २०१९’ जाहीर झाला आहे.

सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा 'अनुवाद पुरस्कार'
SHARES

रंगकर्मी आणि चित्रपट दिग्दर्शिका अशी ख्याती असलेल्या मराठी प्रांगणातील बुजूर्ग लेखिका सई परांजपे यांना यंदाचा अनुवादासाठी दिला जाणारा मानाचा 'साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २०१९' जाहीर झाला. सई परांजपे यांच्या 'आणि मग एक दिवस' या साहित्यकृतीला अनुवाद पुरस्कार घोषित झाला आहे. तसंच, याची पॉप्युलर प्रकाशननं निर्मिती केली आहे.

सोमवारी दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. २३ भाषांमध्ये साहित्यिकांना विविध साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. या पुरस्काराचं स्वरूप ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची आत्मकथा असलेल्या 'अ‍ॅण्ड देन वन डे' या साहित्यकृतीचा अनुवाद 'आणि मग एक दिवस' या साहित्यकृतीत करण्यात आला आहे. मराठी भाषेतील अनुवादित साहित्य पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार आणि निशिकांत ठाकर यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.

सई परांजपे या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, पटकथा लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, तसेच इंग्रजीत अनेक नाटक, बालनाट्येदेखील केली आहेत. ‘जास्वंदी’, ‘सख्खे शेजारी’ आणि ‘अलबेल’ ही त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेली सर्वात गाजलेली नाटके आहेत. नाटक आणि सिनेमातील त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. नाटक, सिनेमात अष्टपैलू कलाकार असण्याव्यतिरिक्त परांजपे या रेडिओ निवेदिका, माहितीपट दिग्दर्शिका, तसेच सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.



हेही वाचा -

गोरेगाव स्थानकातील 'हे' पूल दुरुस्तीसाठी बंद

उन्हाळी सुट्टी निमित्ताने ७८ विशेष गाड्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा