पश्चिम रेल्वेच्या (western Railway) प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईतील गोरेगाव (Goregaon) स्थानकातील पादचारी पूल (FOB) बंद ठेवण्यात येणार आहेत. गोरेगाव स्थानकातील उत्तर दिशेकडील पूलाच्या पायऱ्या आणि पूर्वेकडील जुना स्कायवॉक दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
गुरुवार २७ फेब्रुवारीपासून गोरेगाव स्थानकातील पूल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं पूलाच्या दुरूस्तीच्या काळात जुन्या स्कायवॉकलगत असलेल्या नव्यानं बांधण्यात आलेल्या पायऱ्यांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
काही दिवसांपूर्वीतं भायखळा स्थानकातील कल्याण (Kalyan) दिशेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३, ४ ला जोडणारा पादचारी पूल तब्बल एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणं ८ फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७वरील पादचारी पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील (Andheri Station) गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर (Gokhke Bridge Collapes) रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मार्गावरील धोकादायक पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, अनेक पूल दुरूस्तीसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र, हे पूल बंद केल्यानं प्रवाशांना अनेक समस्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.
हेही वाचा -
विकृताला चोप, नितीन नांदगावकर यांना मिळाला जामीन
जयललिता यांच्या जयंतिनिमित्त 'थलायवी'चा पोस्टर प्रदर्शित