Advertisement

राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची नियुक्ती


राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची नियुक्ती
SHARES

राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक निवृत्त झाले असून त्यांच्या जागी मुख्य सचिव म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर संपली असून वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची नियुक्ती करण्यात अाली आहे.


हे होते शर्यतीत

सुमित मलिक यांच्या निवृत्तीनंतर मुख्य सचिवपदासाठी तीन प्रमुख दावेदार मानले जाते होते. त्यात डी. के. जैन यांच्यासह गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव आणि अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावांची चर्चा होती. या तिन्ही नावांमध्ये डी. के. जैन यांचं नाव अाघाडीवर होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही जैन यांनाच पसंती असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात अाली आहे.


कोण अाहेत डी. के. जैन?

जैन हे १९८३ च्या बॅचचे सनदी अधिकारी असून ते ३१ जानेवारी २०१९ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे. दरम्यान, मुख्य सचिवपदासाठी मेधा गाडगीळ याचंही नाव चर्चेत होतं आणि सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांच्या नियुक्तीचीही दाट शक्यता होती. पण सेवा सेवा ज्येष्ठता असूनही गाडगीळ यांची संधी हुकली आहे.


हेही वाचा -

४ आठवड्यांत माहिती आयुक्त मिळणार?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा