Advertisement

लसीकरण केंद्र कोरोना प्रसारक मंडळं होऊ नये, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत, तर बहुतांश लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करत आहेत

लसीकरण केंद्र कोरोना प्रसारक मंडळं होऊ नये, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती
SHARES

सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत, तर बहुतांश लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करत आहेत. लसीकरण केंद्रांवर उसळणाऱ्या गर्दीकडे पाहता ही केंद्र कोरोना प्रसारक मंडळं होऊ नयेत, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचं आवाहन जनतेला केलं. 

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षी १ मे ला लॉकडाऊनच होता. या वर्षी देखील फारसा फरक पडलेला नाही. आपण लॉकडाऊन सदृश्य निर्बंध घातले आहेत. कालच उच्च न्यायालयाने विचारलं आहे की कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे का? मला वाटतं याहून कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता फारशी येणार नाही.  

हेही वाचा- एकरकमी १२ कोटी लस विकत घेण्याची महाराष्ट्राची तयारी- उद्धव ठाकरे

या बंधनांमुळे रुग्णसंख्या ओसरली नसली, तरी जिथं ९ ते १० अॅक्टिव्ह रुग्ण जाण्याची शक्यता होती. तिथं आपण या बंधनांमुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ ते साडेसहा लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे. अजून काही काळ आपल्याला ही बंधनं पाळण्याची आवश्यकता आहे. ही बंधनं लावणं सोपं आहे पण पाळणं अवघड आहे. 

येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर टाकण्यात आलेली आहे. तशी जबाबदारी आपण समर्थपणे पेलली आहे. सर्व वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची सोय आपण करतो आहोत. परंतु लसींचा साठा पुरेसा नसल्याने लसीकरणावर मर्यादा येत आहेत. 

आपल्याकडे दिवसाला १३ लाख लोकांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु केंद्राकडून मर्यादीत साठा मिळत आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी सध्या ३ लाख लसी आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला जसजशी लस उपलब्ध होईल, तसतशी आपण ही संख्या वाढवत जाणार आहोत. हे प्रमाण अत्यल्प आहे. आपल्याला दीड-दोन कोटी डोस महिन्याचे मिळाले, तर आपण दिवस-रात्र मेहनत करू. त्यामुळे कुठेही गोंधळ करू नका, गर्दी करू नका. ही लसीकरण केंद्र कोविड प्रसारक मंडळ होता कामा नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा