Advertisement

संपामुळं १७४ एसटी कर्मचारी बडतर्फ

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचारी आदोलन करत आहेत.

संपामुळं १७४ एसटी कर्मचारी बडतर्फ
SHARES

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचारी आदोलन करत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं एसटीचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं आता एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान,

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करूनही ते न परतल्यानं सोमवारी १७४ निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळं बडतर्फ कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४१५ वर पोहोचली आहे.

एसटीमधील कनिष्ठ श्रेणी कामगार संघटनेनं २० डिसेंबरला संप मागे घेतला. त्यानंतर महामंडळानंही कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घेत २३ डिसेंबरपर्यंत कर्तव्यावर येण्याचं आवाहन केलं. परंतु, बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यास प्रतिसाद न दिल्यानं २४ डिसेंबरपासून पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात आली.

आतापर्यंत ४१५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, १० हजार ७३१ जणांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, आतापर्यंत रोजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कारवाईच्या इशाऱ्यानंतरही कामावर येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना आतापर्यंत २ वेळा संधी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही ते कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळं त्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत ६०० हून अधिक निलंबित कामगारांना तशी नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा