'एम' विभागातील डम्पिंगचा प्रश्न कधी सुटणार?

  Govandi
  'एम' विभागातील डम्पिंगचा प्रश्न कधी सुटणार?
  मुंबई  -  

  मुंबईचा गोवंडी विभाग हा 'डम्पिंग ग्राऊंड'साठी प्रसिद्ध आहे. 'डम्पिंग ग्राऊंड' म्हटले की नजरेपुढे येते प्रदूषण आणि या प्रदूषणाचा मुंबईकरांना होणार त्रास. या प्रदूषणाचा गोवंडीपासून दूर राहणाऱ्या मुंबईकरांना त्रास होत असेल, तर 'डम्पिंग ग्राऊंड' परिसरात राहणाऱ्या स्थानिकांची काय अवस्था होत असेल? याप्रश्नी स्थानिकांनी मुंबई महापालिकेकडे अनेकदा निवेदने दिली, मागण्या केल्या. पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर स्थानिकांनी कंटाळून 1998 साली महापालिकेच्या 'अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट' (एएलएम) मध्ये सहभागी होऊन स्वस्त:च परिसराचा कायापालट करण्याचे ठरवले.

  'एएलएम'द्वारे जनसहभागातून परिसर सुंदर आणि स्वछ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यात येतो. त्याला महापालिका विविध विभागांद्वारे सहकार्य करते. महापालिकादेखील काही उपक्रमांची अंमलबजावणी या 'एएलएम'द्वारे करते. सुरूवातीला 'डम्पिंग ग्राऊंड'च्या प्रश्नावर एकवटेल्या स्थानिकांनी एक एक करत येथे आपापले 'एएलएम' बनविण्यास सुरूवात केली. अशा प्रकारे पालिकेच्या 'एम' विभागातील पूर्व आणि पश्चिमेकडील सुमन नगर ते ट्रॉम्बे आणि माहुल ते छेडा नगर या परिसरात एकूण 28 'एएलएम' स्थापन झाले आहेत.

  असे आहेत 'एम' विभागातील 'एएलएम' -

  1 ) डायमंड गार्डन रहिवासी फोरम
  2 ) 11 वा रस्ता (पू) रहिवासी मंच
  3 ) 13 वा रस्ता रहिवासी असोसिएशन
  4 ) डी. के. संधू मार्ग
  5 ) 4 था रस्ते रहिवासी मंच
  6 ) स्वस्तिक पार्क 'एएलएम'
  7 ) शक्ती चेतना कल्याण समिती
  8 ) सुमन नगर निवासी 'एएलएम'
  9 ) पेस्टम सागर रोड क्रमांक 3 ते 6 'एएलएम'
  10) छेडा नगर गायत्री कुसुम 'एएलएम'
  11) सेंट्रल अव्हेन्यू रहिवासी फोरम
  12) म्हैसूर कॉलनी 'एएलएम'
  13) मीना टाॅवर्स 'एएलएम'
  14) बीजीसीआरए (बाजार गेट नागरिक रहिवासी मालमत्ता)
  15) घाटला रोड, रहिवासी फोरम
  16) पोस्टल कॉलनी रोड रहिवासी वेल्फेअर असोसिएशन आणि 'एएलएम'
  17) बीपीसीएल (अजीज बाग / वाशी नाका)
  18) 17 वा रस्ता निवासी मंच
  19) इको प्रेम (जीएमएल, आरडी)
  20) लोटस कल्याण कॉम
  21) अॅटोमिका सीएचएस (पीएल एलोकंडे मार्ग)
  22) चिता कॅम्प एफ-सेक्टर
  23) आशीष शेत निवासी
  24) ग्रीन एकर्स रेसी फोम
  25) स्वच्छ देवनार मंच (दत्तगुरु) (महालक्ष्मी मंदिर रोड)
  26) बीएसडी मार्ग 'एएलएम'
  27) रहेजा एक्रोपॉलिस (गोवंडी पोलीस स्टेशन, आरडी)
  28) देवनार बाग (महालक्ष्मी मंदिर रोड)

  यात 1 ते 17 'एएलएम' एम - पश्चिम, तर 18 ते 28 एम पूर्वेकडील आहेत.

  'एएलएम' च्या माध्यमातून आम्ही परिसराचा कायापालट करण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरलो आहोत. स्वच्छता ठेवण्यासोबत परिसर हिरवागार करण्यातही 'एएलएम'ने मोठी भूमिका बजावलेली आहे. त्याचे उत्तम उदाहरण चेंबूरचे डायमंड गार्डन 'एएलएम' आहे. येथील 'एएलएम'चे समन्वयक 66 वर्षीय राज कुमार शर्मा झालेल्या कामावर समाधानी आहेत. परंतु त्याचसोबत नव्या कामांबाबत ते फारच आशावादी आहेत.

  'एएलएम'मध्ये सहभागी झाल्यानंतर सुरूवातीला सर्वच स्थानिक अतिशय उत्साही असतात. विविध कामांमध्ये त्यांचा सहभाग सक्रीय असतो. पण नंतर सदस्यांचा हा उत्साह मावळायला लागतो. सदस्यांचा हा उत्साह आबाधित राहावा म्हणून महापालिकेने 'एएलएम'च्या माध्यमातून नागरी सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून सदस्य नेहमी कार्यरत राहतील. दर महिन्याला होणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांसोबतच्या मिटींगमध्ये सदस्यांच्या मागणीनुसार हा विषय उपस्थित होऊ शकतो. 

  - सुभाष पाटील, सहाय्यक आयुक्त, एम पश्चिम विभाग

  येथील 28 'एएलएम'नी पुढाकार घेऊन परिसराचा कायापालट करण्याचे काम हात घेतलेले असले, तरी 'डम्पिंग ग्राऊंड'द्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिलेला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.