कांदिवलीत डस्टबिनचं वाटप

 Kandivali
कांदिवलीत डस्टबिनचं वाटप
कांदिवलीत डस्टबिनचं वाटप
कांदिवलीत डस्टबिनचं वाटप
See all

कांदिवली - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात वॉर्ड क्रमांक 24 चे काँग्रेसचे नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईरही मागे नाहीत. त्यांच्या निधीतून सोमवारी कांदिवलीच्या जानुपाडतल्या रहिवाशांच्या घरोघरी जाऊन कचऱ्याच्या डब्याचं वाटप करण्यात आलं. या वेळी नगरसेवक भोईर म्हणाले की नागरिकांनी आपल्या घरासह आसपासचा परिसरही स्वच्छ ठेवावा. ज्यामुळे आजार टाळण्यास मदत होईल. तसंच येत्या काही दिवसातच जानुपाडातल्या जनतेसाठी 120 लिटरच्या कचराकुंडीची व्यवस्था केली जाईल. ज्यामुळे तिथल्या जनतेला सुका आणि ओला कचरा वेगवेगळा टाकण्यास मदत होईल.

Loading Comments