Advertisement

करदात्यांसाठी खुशखबर! आगाऊ मालमत्ता कर भरल्यास सवलत

महापालिकेकडून अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुंबईकरांना मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरल्यास या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

करदात्यांसाठी खुशखबर! आगाऊ मालमत्ता कर भरल्यास सवलत
SHARES

मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची रक्कम आगाऊ तथा विनाविलंब भरल्यास ग्राहकांना त्यावर दोन ते चार टक्क्यांची सवलत मिळणार आहे. महापालिकेकडून यासाठी अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुंबईकरांना मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरल्यास या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.


२०१० साली योजनेची सुरुवात

मालमत्ता कराची रक्कम आगाऊ वसूल करण्यासाठी अर्ली बर्ड इन्सेंटिव योजना २०१०पासून राबवण्यात येत आहे. आता सन २०१८-१९साठीही या योजनेचा लाभ मुंबईकरांना घेता येणार आहे. मागील वर्षी १ लाख ८ हजार ९९ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत ६८५.१४ कोटी मालमत्ता कराची रक्कम भरली. यामध्ये १५.४८ कोटी रुपयांची सवलत ग्राहकांना दिली गेली होती.

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थापन अभियानांतर्गत सुचवण्यात आलेल्या सुधारणांपैकी प्रामाणिक व तात्काळ कर भरणाऱ्या करदात्यांना काही प्रमाणात सूट देण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार ही सूट दरवर्षी दिली जाते. ३० जून २०१८पर्यंत किंवा त्यापूर्वी मालमत्ता कराची रक्कम भरल्यास एप्रिल ते सप्टेंबर २०१८च्या मालमत्ता कराच्या बिलावर २ टक्के तर ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९च्या मालमत्ता कराच्या बिलावर ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर जुलै २०१८पर्यंत मालमत्ता कराचा भरणा या कालावधीकरता केल्यास अनुक्रमे एक व तीन टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती करनिर्धारण व संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी देवीदास क्षिरसागर यांनी दिली आहे.


योजनेचा लाभ घेतलेल्यांची संख्या



सन २०१५-१६सन २०१६-१७सन २०१७-१८
मालमत्ताधारक७५ हजार ६५१८९ हजार१ लाख ०८ हजार ९९
जमा झालेली रक्कम४३९.०७ कोटी१००० कोटी६८५.१४ कोटी
दिलेली सवलत८.०० कोटी रुपये११.८० कोटी रुपये१५.४८कोटी



हेही वाचा

आता मालमत्ता कर फ्लॅटवर लागणार, इमारतीवर नाही!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा