Advertisement

तर मुंबईतील गुंतवणूक करणारे इतर शहरात जातील


तर मुंबईतील गुंतवणूक करणारे इतर शहरात जातील
SHARES

मुंबईत पावसाच्या पाण्यामुळे जरी पाणी साचलं तरी मागील अनुभवाच्या तुलनेत फारच कमी होतं. तेही काही मिनिटांमध्ये वाहून जात त्याचा निचरा झाला तरीही मुंबई तुंबली असं दाखवून हे शहर खराब असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. हे वास्ववदर्शी नसून अशा प्रकारे जर चुकीचं दाखवलं गेलं तर या शहरात जे गुंतवणूक करत आहेत, ते बंगळुरू आणि हैदराबाद शहराकडे वळतील. त्यामुळे जनतेने अतिशयोक्ती न करता वस्तुस्थिती काय आहे? हे दाखवावं, असं आवाहन अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीच्या सभेत विरोधीपक्षनेत्यांच्या सभा तहकुबिला उत्तर देताना स्पष्ट केलं.  


५ हजार कॅमेरे बसवले

मुंबईत पावसामुळे पाणी तुंबून जनतेचे हाल होऊ नये यासाठी महापालिका कार्यतत्पर अाहे. विविध प्राधिकरणांशी यासाठी समन्वयही साधून असल्याचं अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितलं. मुंबईत शहर पोलिसांच्यावतीनं बसवण्यात आलेले ५ हजार कॅमेरे आणि महापालिकेनं बसवलेले कॅमेरे अशाप्रकारे पाणी तुंबणाऱ्या भागांमध्ये मुंबई महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवलं जातं. त्यामुळं मुंबईच्या सुमारे ८० टक्के भागांवर या कॅमेरांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. तसंच महापालिका विभाग कार्यालयांलयांमधील आपत्कालीन नियंत्रण कक्षात कामगारांची पदंही भरली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं.


२१२ लाख क्युबिक मीटर गाळ

मुंबईतील शहर,पूर्व व पश्चिम उपनगरातील विविध नाल्यांमधून सुमारे २१२ लाख क्युबिक मीटर एवढा गाळ काढण्यात आल्याचंही मुखर्जी यांनी सांगितलं. नालेसफाईचं काम झाल्यानंतरही त्यात पुन्हा नागरिकांकडून कचरा फेकला जातो. त्यामुळं मुंबईकरांमध्ये नागरी कर्तव्याची जाण निर्माण करून त्यांना नाल्यात कचरा टाकला जावू नये याबाबत जनजागृती करण्याचं हाती घेतलं जाणार असल्याचंही मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

प्रतिज्ञापत्रात नको कॉपी पेस्ट, न्यायमूर्तींची पालिकेला सूचना

अागीत ६ वर्षात ३०० लोकांचा मृत्यू



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा