पोलीसांच्या 8 तास ड्युटीची आयडिया यशस्वी

 Deonar
पोलीसांच्या 8 तास ड्युटीची आयडिया यशस्वी
Deonar, Mumbai  -  

इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीसांची देखील 8 तास ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी वर्षभरापूर्वी देवनार पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई रवींद्र पाटील यांनी केली होती. पोलीस आयुक्तांनी दखल घेत देवनार पोलीस ठाण्यातूनच याची 5 मे 2016ला सुरुवात केली. पहिल्या टप्यात रायटर आणि अमलदारांचा समावेश केला. त्यानंतर बिट मार्शल आणि शेवटी अधिकारी वर्गाला यामध्ये समाविष्ट करण्यात आले. 

देवनार पोलीस ठाण्यात हा प्रयोग वर्षभरात यशस्वी झाल्यानं शुक्रवारी देवनार पोलीस ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हजेरी लावत पोलीस शिपाई रवींद्र पाटील आणि त्याच्या संपूर्ण टीमचा सत्कार केला.

Loading Comments