Advertisement

अभिजीत बांगर मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

अश्विनी भिडे, पी. वेलरासू यांचीही बदली

अभिजीत बांगर मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी
SHARES

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशांतर राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, अश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर भिडे यांच्याजागी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी यांची नेमणूक झाली आहे.

मुंबई महापालिकेचे आणखी एक अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नेमणूक करण्यात आली आहे. वेलारासू यांची बदली करताना त्यांना नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजय मीना यांची नेमणूक झाली आहे. सनदी अधिकारी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, शुभम गुप्ता यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर विशाल नरवडे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आला नाही. राज्य सरकार चहल यांना आयुक्तपदी ठेवण्याबाबत आग्रही आहे. पण निवडणूक आयोग त्यांच्या बदलीवर ठाम असल्याने राज्य सरकार काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

  1. अमित सैनी, मिशन डायरेक्टर, जलजीवन मिशन, यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती.

  2. नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी संजय मीणा यांची नियुक्ती.

  3. राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती.

  4. विशाल नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर नियुक्ती.

  ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  6. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर नियुक्ती.

  7. कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर नियुक्ती.

  8. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.

  9. संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथे नियुक्ती.

  10. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती.

  11. पृथ्वीराज बीपी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती.

  12. डॉ. कुमार खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, यांची आयुक्त, साखर, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



हेही वाचा

UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलियम्स परीक्षा पुढे ढकलल्या

'12th Fail'चे मनोज कुमार शर्मा यांची महाराष्ट्र पोलिस IG पदावर वर्णी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा