Advertisement

मुंबईतील सर्व इमारतींच्या विद्युत कामांचं लेखा परिक्षण सक्तीच व्हावं, महापालिकेत मागणी


मुंबईतील सर्व इमारतींच्या विद्युत कामांचं लेखा परिक्षण सक्तीच व्हावं, महापालिकेत मागणी
SHARES

मुंबईमध्ये दिवसेंदिवस आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढ होत असून यामध्ये वीजेच्या शॉटसर्किटमुळे आगी लागण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे होणाऱ्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबईतील इमारतींच्या विद्युत विषयक सर्व कामांच्या लेखा परिक्षण सक्तीच व्हावं अशी मागणी केली जात आहे.


'विद्युत विषयक सर्व कामांचं लेखा परिक्षण करा'

मुंबईमध्ये दर ३० वर्षांनी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण आणि दर १० वर्षांनी अग्निशमन यंत्रणेचं लेखापरिक्षण केलं जातं. त्याच धर्तीवर दर १० वर्षांनी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व इमारतींमधील विद्युत विषयक सर्व कामांचं लेखा परिक्षण सक्तीचं व्हावं, अशी मागणी भाजपा नगरसेविका लिना पटेल-देहेरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


म्हणून शॉटसर्किट होतं

'नवीन इमारतींचं बांधकाम करताना भिंतीच्या तसेच छताच्या आतून विद्युत जोडण्या केल्या जातात. बदलत्या परिस्थितीनुसार विद्युत साधनांचा वापरही बराच वाढलेला असल्यामुळे भिंतीच्या आतील बाजूंनी जाणाऱ्या विद्युत तारांची संख्याही अधिक असते. घरातील मूळ रहिवासी सोडून गेल्यानंतर तेथे राहण्यास येणारा नवीन रहिवासी आपल्या गरजेनुसार विविध सोयी-सुविधा करून घेत त्यात बदल करतो. काही वर्षांनी या विद्युत तारा जुन्या होतात आणि विजेच्या अतिरिक्त वापर झाल्यास विद्युत पुरवठा यंत्रणेवर याचा ताण पडून शॉटसर्किट होतं', असं लिना पटेल- देहेरकर यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा