Advertisement

वीज बिलात ५० रुपयांची वाढ होणार?

मुंबईकरांच्या वीज बिलात आता अतिरिक्त पारेषण शुल्कापोटी ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

वीज बिलात ५० रुपयांची वाढ होणार?
SHARES

मुंबईकरांच्या वीज बिलात आता अतिरिक्त पारेषण शुल्कापोटी ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. खारघर-विक्रोळीमध्ये नवीन वीज वाहिनी टाकली जात आहे. या वाहिनीच्या उभारणी खर्चापोटी अतिरिक्त पारेषण शुल्क आकारण्यास वीज नियामक आयोगानं याला मंजुरी दिली आहे.

मुंबईला लागणाऱ्या वीजेची मागणी साधारणपणे ३ हजार ५०० मेगावॅटच्या जवळपास आहे. महापारेषण राज्य सरकारच्या कंपनीकडून २ हजार २०० ते २ हजार ५०० मेगावॅट वीज पुरवली जाते. आगामी काळातील वाढणाऱ्या वीजेची मागणी लक्षात घेता अतिरिक्त वीज वाहिनी उभारणीचं काम केलं जात आहे. यामध्ये ४०० केव्ही क्षमतेच्या महत्वाच्या वाहिनीचा समावेश आहे.

या वाहिनीच्या उभारणीसाठी खारघर-विक्रोळी ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनी स्थापन करण्यात आली होती. याकंपनीकडून हे काम अदानी ट्रान्समिशनला देण्यात आलं आहे. खारघर विक्रोळी वीज वाहिनी उभारणीच्या खर्चापोटी अतिरिक्त पारेषण शुल्क लावण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

खारघर विक्रोळी पारेषण वाहिनीचे काम साधारणपणे मार्च २०२२ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पारेषण शुल्क वसूल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या वाहिनीचा उभारणी खर्च साधारणपणे २२०० कोटी रुपये आहे. तर एका वर्षात अतिरिक्त पारेषण शुल्कापोटी २५० कोटी रुपयांची वसुली होणार आहे.



हेही वाचा

मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉक सुरू, मुख्यालयाच्या इमारतीची सैर करण्याची संधी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा