Advertisement

मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉक सुरू, मुख्यालयाच्या इमारतीची सैर करण्याची संधी

गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने गुरूवारपासून हेरिटेज वॉक सुरू केलं आहे. या निमित्ताने पर्यटकांना ही ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे.

मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉक सुरू,  मुख्यालयाच्या इमारतीची सैर करण्याची संधी
SHARES

ऐतिहासिक मुंबई महानगर पालिकेत गुरूवारपासून हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला आहे. आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीची सैर करण्याची संधी पर्यटक, मुंबईकरांना खुली झाली आहे.  

या हेरिटेज वॉकचा पहिला मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला. गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने गुरूवारपासून हेरिटेज वॉक सुरू केलं आहे. या निमित्ताने पर्यटकांना ही ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. 

महापालिका इमारत गॉथिक शैलीतील आहे. ही चार मजली इमारत दगडी कामातून तयार झाली आहे. ही इमारत जागतिक वारसा यादीत येते. या इमारतीच्या बाजूलाच पालिकेची सहा मजली विस्तारीत इमारत आहे. महापालिकेत पालिका आयुक्त, महापौर, चार अतिरिक्त आयुक्त, गटनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि विविध खात्यांची दालने आहेत. तसेच महापालिका सभागृह हे या इमारतीचं मुख्य आकर्षण आहे. पालिका सभागृहात विविध महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांना पाहता येणार आहेत.

दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे. त्यासाठी एक गाईडही ठेवण्यात आला आहे. या गाईडच्या मदतीने पर्यटकांना या इमारतीचा इतिहास जाणून घेता येणार आहे.हेही वाचा -

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोकाRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा