Advertisement

अंधेरीकरांना ४७ वर्षांनी मिळाला पर्यायी रस्ता


अंधेरीकरांना ४७ वर्षांनी मिळाला पर्यायी रस्ता
SHARES

अंधेरी (पूर्व) -  परिसरातील ना. सी. फडके मार्ग आणि अंधेरी कुर्ला मार्ग यांना जोडणारा पर्यायी मार्ग आता खुला झाला आहे. सुमारे दीड किमी लांबीचा आणि १८.३० मीटर म्हणजेच ६० फूट एवढा रुंद असलेला विकास नियोजन रस्ता एका सोसायटीने संरक्षण रस्ता बांधून अडवून ठेवला होता. सोसायटीने अनधिकृतरीत्या कब्जा केल्यामुळे ४७ वर्षे हा रस्ता बंद होता. त्यामुळे ही संरक्षक भिंत तोडून हा पर्यायी मार्ग खुला करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन आराखड्यानुसार अंधेरी पूर्व मधील मांजरेकरवाडी परिसरातील एक ६० फुटी रस्ता ‘सिंधिया' या सोसायटीच्या अनधिकृत बांधकामांमुळे मागील ४७ वर्षे बंद होता. या सोसायटीने डी.पी.रोडच्या एका बाजूस अनधिकृत संरक्षक भिंतीचे बांधकाम, तर दुस-या बाजूला सुरक्षा चौकी आणि प्रवेशद्वार बांधले होते. ज्यामुळे या जागेचा खाजगी वापर केला जात होता. परिणामी सामान्य नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येत नव्हता. अनधिकृत संरक्षण भिंतीमुळे या रस्त्यावरील इतर सोसायटीमधील नागरिकांना देखील मोठा वळसा घालून जावे लागत होते. याबाबत परिमंडळ – ३ चे उपायुक्त वसंत प्रभू यांच्या मार्गदर्शनानुसार ‘के-पूर्व’ सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करत रस्त्याच्या मधोमध बांधलेली भिंत तसेच इतर सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. ज्यामुळे अंधेरी (पूर्व) परिसरातील ना. सी. फडके मार्ग आणि अंधेरी-कुर्ला मार्ग यांना जोडणारा आणखी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास देखील मदत होणार आहे. हा रस्ता ताब्यात घेण्यात आला असून त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे शनिवारपासून हा रस्ता नागरिकांसाठी खुला होईल, अशी माहिती महापालिकेच्या ‘के-पूर्व’ सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली आहे.

मालाडकरांनंतर अंधेरीकरांचा वळणाचा प्रवास झाला कमी
मागील ४७ वर्षांपासून नागरिकांच्या वापरासाठी बंद असलेला हा रस्ता महापालिकेने साधारणपणे ४ दिवसांच्या प्रत्यक्ष कारवाईनंतर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी खुला केल्याने या परिसरातील जवळपास ४० सोसायटींमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

सोसायटीवर होणार कारवाई

सिंधिया सोसायटीने सुमारे ४७ वर्षे हा रस्त्याचा काही भाग अनधिकृतपणे आपल्या ताब्यात ठेवल्याने याबाबत नियमानुसार सोसायटीवर कारवाई करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा