Advertisement

मुंबईत होऊ शकते महापुराची पुनरावृत्ती!


मुंबईत होऊ शकते महापुराची पुनरावृत्ती!
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगार, लाईफस्टाईलच्या आकर्षणातून आजही हजारो जण दाखल होतात. मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे, असे सर्वांनाच वाटते. पण घर आणि बजेट यांचा ताळमेळ न बसल्याने झोपडपट्ट्यांचा आसरा घेतला जातो. परिणामी, झोपड्यांचा विस्तार वाढत जाऊन त्याचा फटका मुंबईकरांनाच बसतो. याचे उत्तम उदाहरण आहे सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला झोपडपट्टी!



वाकोला परिसरातील झोपडपट्टी मिठी नदीच्या कडेलाच वसलेली असून येथील रहिवाशांनी 26 जुलै रोजी मिठी नदीचा कहर अनुभवलेला आहे. शेकडो जणांचे संसार या महाप्रलयात उद्धवस्त झाले होते, तर अनेकांना आपल्या प्राणालाही मुकावे लागले होते.



त्यानंतर मिठी नदी रुंदीकरण योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या काठावर वसलेल्या झोपड्यांवर कारवाई करुन पात्राचे रुंदीकरण केले. परंतु हे काम पूर्ण होताच महापालिकेने कुठलीही दक्षता न घेतल्याने नदीच्या काठावर पुन्हा झोपड्या वाढू लागल्या. झोपड्यांच्या वाढत्या पसाऱ्याने मिठी नदीचे पात्र पुन्हा आकसत चालल्याने येथे कधीही महापुराची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.



वाकोला परिसरातील स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी रहिवाशांनी एकत्र येत 'वाकोला एलएलएम'ची स्थापना केली होती. सुरुवातीच्या टप्प्यात या एलएमच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसंदर्भातील प्रश्न सोडविण्यात आले. पण वाढत्या झोपड्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नागरी समस्यांचे प्रश्न सोडविताना 'वाकोला एलएलएम'च्या सदस्यांच्या नाकीनऊ येत असल्याची माहिती 'वाकोला एएलएम'च्या अध्यक्ष शिल्पा धरोड यांनी दिली.



हे देखील वाचा -

वाकोल्यातील फेरीवाल्यांवर अखेर कारवाई


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा