Advertisement

नीरव मोदीच्या कार, पेंटिंग्सचा होणार लिलाव

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदीला बुधवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर भारतातही सक्तवसूली संचलनालयाने नीरव मोदी विरुद्ध विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे.

नीरव मोदीच्या कार, पेंटिंग्सचा होणार लिलाव
SHARES

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदीला बुधवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर भारतातही अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने नीरव मोदी विरुद्ध विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. 


न्यायालयाची परवानगी

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अॅक्ट न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला नीरव मोदीच्या ११ महागड्या गाड्या आणि १७३ पेंटिग्जचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी नीरव मोदीच्या घरांवर छापे टाकले होते. त्यावेळी त्यांनी अनेक मौल्यवान वस्तू जप्त केल्या होत्या.

तसंच त्याच्या घरात अनेक दिग्गज चित्रकारांच्या मौल्यवान पेंटिग्जचा संग्रह सापडला होता. त्यानंतर या वस्तूंचा लिलाव करून पैसे वसूल करण्याची परवानगी न्यायलयाकडे मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज मान्य करत लिलावातून जमा होणारे पैसे न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.




हेही वाचा -

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, पीएनबी घोटाळ्याप्रकरणी बेड्या

बेकायदेशीर होर्डिंग लावणं नगरसेवकाच्या अंगलट; न्यायालयाकडून २४ लाखांचा दंड




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा