कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, पीएनबी घोटाळ्याप्रकरणी बेड्या

नीरव मोदी याने लंडनमध्ये हिऱ्यांचा व्यवसायही सुरू केल्याचा तसंच तो तिथं ऐषोआरामात जगत असल्याचा व्हिडीओ ‘टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केला होता. मोदी लंडनमधील ७२ कोटी रुपये किंमतीच्या लक्झरिअस फ्लॅटमध्ये राहत असून त्यासाठी महिन्याला १५ लाखांपेक्षा जास्त भाडे मोजत असल्याचा पर्दाफाशही 'टेलिग्राफ'ने केला होता.

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, पीएनबी घोटाळ्याप्रकरणी बेड्या
SHARES

पंजाब नॅशनल बँके (पीएनबी)ला १३ हजार कोटी रुपयांना ठकवून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. लंडनच्या वेस्ट मिनिस्टर कोर्टाने त्याच्याविरोधात अटक वाॅरंट काढनंतर त्याला कुठल्याही क्षणी अटक होईल, अशी दाट शक्यता होती. त्यानुसार ही अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला आता वेस्ट मिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. 'पीएनबी' घोटाळ्याची चौकशी करणारे सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालया (ईडी) अधिकारी याप्रकरणी लंडन पोलिसांच्या संपर्कात आहेत.

ऐषोआरामात जीवन

नीरव मोदी याने लंडनमध्ये हिऱ्यांचा व्यवसायही सुरू केल्याचा तसंच तो तिथं ऐषोआरामात जगत असल्याचा व्हिडीओ ‘टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केला होता. मोदी लंडनमधील ७२ कोटी रुपये किंमतीच्या लक्झरिअस फ्लॅटमध्ये राहत असून त्यासाठी महिन्याला १५ लाखांपेक्षा जास्त भाडे मोजत असल्याचा पर्दाफाशही 'टेलिग्राफ'ने केला होता.

रेड काॅर्नर नोटीस

त्यानंतर नीरव मोदी विरोधात काढलेल्या ‘रेड कॉर्नर’ नोटिसीवरून त्याला त्वरित अटक करण्याची मागणी सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटन सरकारकडे केली होती. अटकेनंतर मोदीचं भारतात प्रत्यार्पण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाई

या मागणीनुसारच ब्रिटनच्या गृह सचिवांनी न्यायालयात कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिल्याचं 'ईडी'ने म्हटलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी 'पीएनबी'ला १३ हजार ७०० कोटींना बुडवून परदेशात पळ काढला होता. चोक्सी सध्या कॅरेबियन बेटांवर आश्रयाला असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा-

ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा