Advertisement

मुंबईमधील ५ नामंकित हॉटेल्सना पर्यावरण विभागाची नोटीस, ३० हॉटेल्सची तपासणी सुरु

पर्यावरण विभागाने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील जवळपास ३० हॉटेल, रेस्टाॅरंट आणि पब्सची तपासणी सुरू केली आहे. यापैकी ५ हॉटेल्सना पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसाही बजावल्या आहेत.

मुंबईमधील ५ नामंकित हॉटेल्सना पर्यावरण विभागाची नोटीस, ३० हॉटेल्सची तपासणी सुरु
SHARES

मुंबईत दरवर्षी हजारो पर्यटक नववर्षाचं स्वागत करतात. न्यू इयर पार्टीसाठी मुंबईतील सारे नामांकित आणि पंचतारांकित हॉटेल्स, पब सज्ज होतात. मात्र या हाॅटेल्स, रेस्टाॅरंट्स आणि पबमध्ये पर्यावरण नियमांचं सर्रासपणे उलंघन होत असतं. त्यामुळेच अनेकदा कमला मिल सारख्या दुर्दैवी घटनांना सामोरं जावं लागतं. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पर्यावरण विभागाने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील जवळपास ३० हॉटेल, रेस्टाॅरंट आणि पब्सची तपासणी सुरू केली आहे. यापैकी ५ हॉटेल्सना पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसाही बजावल्या आहेत.


कुठल्या हाॅटेल्सचा समावेश?

'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आलेल्या या हॉटेल्समध्ये हॉटेल रेसिडेन्सी, शरयू प्रॉपर्टी अॅण्ड हॉटेल प्रा. लिमिटेड, हॉटेल पवई , हॉटेल इस्टर्न इंटरनॅशनल, दादर येथील हॉटेल रामी यांचा समावेश आहे.


नियमांची पायमल्ली

'कारणे दाखवा' नोटीस पाठवलेल्या ५ हॉटेल्सकडून पर्यावरण विभागाच्या नियमांची पायमल्ली होतं असल्याचं समोर आल्याची माहिती पर्यावरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. संबंधित हॉटेल्सकडून काही ठिकाणी उंची संदर्भात नियम डावलण्यात आले, तर काही ठिकाणी अग्नीसुरक्षेसंदर्भातील अटी शर्तीची पूर्तता झाली नाही. हे मुद्दे महापालिकेच्या अखत्यारीत येत असले, तरी पर्यावरण विभाग त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावू शकत असल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काही हॉटेल्सच्या बाबतीत 'ना हरकत प्रमाणपत्रां'चा मुद्दा असल्याचं अधिकाऱ्यानी सांगितलं.


कारवाईला राजकीय रंग

कमला मिल कंपाऊंडमधील दुर्घटना ताजी असताना मागील आठवड्यात लोणावळा येथील कीज या हॉटेलवर पर्यावरण विभागाने कारवाई केली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या कारवाईला राजकीय रंग देण्यात आला हे दुर्दैवी म्हणावं लागेल. मात्र मुंबई आणि राज्यत पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसून अनेक बांधकाम होत असताना नगरविकास, पर्यावरण विभागाचं मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.



हेही वाचा-

कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबन

कमला मिलमधील सर्व अनधिकृत बांधकामे तोडणार- मुख्यमंत्री


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा