Advertisement

वडाळ्यात लवकरच सरकता जिना


वडाळ्यात लवकरच सरकता जिना
SHARES

वडाळा - मध्य रेल्वेची प्रवासी संख्या अंदाजे 40 लाखांहून अधिक आहे. त्यांना दर्जेदार सुविधा देण्याच्या हेतूने मध्य रेल्वे प्रशासनाने 2015 मध्ये मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर 36 सरकते जिने आणि 34 लिफ्ट (उद्वाहन) बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी वडाळा रोड स्थानकांत 3 सरकते जिने बसविण्यात येणार होते. याचधर्तीवर रविवार वडाळ्यातील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 ते 4 च्या वर सरकत्या जिन्यासाठी गर्डर टाकण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र रेल्वे विकास कॉर्पोरेशन सहाय्यक अभियंता राजेश आर. पिल्ले यांच्या उपस्थित हा प्रारंभ करण्यात आला. यावेळी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल पोलीस उपस्थित होते.
सदरील काम एमआरविसीतर्फे करण्यात येत आहे. हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी रात्री लोकल बंद असताना तसेच रविवारच्या मेगाब्लॉकच्या दिवशी काम करण्यात येणार असल्याची माहिती पिल्ले यांनी दिली. सदरील कामासाठी 70 कामगार आणि स्थानकाच्या पूर्व-पश्चिम बाजूस दोन मोठया क्रेन उपलब्ध आहेत असेही त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा