Advertisement

एक्स्प्रेस वे-वरील टोल कंत्राटदाराची वरकमाई


एक्स्प्रेस वे-वरील टोल कंत्राटदाराची वरकमाई
SHARES

मुंबई - मुंबई-पुणे टोल एक्स्प्रेस वे वरील नोव्हेंबरमधील टोलवसुलीची आकडेवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वेबसाईटवर जाहिर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये कंत्राटदाराने टोलवसुलीची संपूर्ण रक्कम वगळता 13 कोटींची वरकमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. 2869 कोटींची वसुली कंत्राटदाराला मार्च 2019 पर्यंत करायची होती. मात्र अडीच वर्षाआधीच नोव्हेंबर 2016 मध्येच ही टोलवसुली पूर्ण झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता एक्स्प्रेस वे वरील टोल बंद होणे गरजेचं होतं. मात्र करारातील कालावधीची तरतुद पुढे करत एमएसआरडीसी आणि कंत्राटदार सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला टाकत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टोल वसुली पूर्ण झाल्यानंतर टोल बंद व्हायला हवा, या न्यायालयाच्या निर्णयाकडेही कंत्राटदार आणि एमएसआरडीसी कानाडोळा करत आहे. टोलवसुली पूर्ण झाल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याने आतापर्यंत अतिरिक्त 13 कोटींची रक्कम कंत्राटटदाराने कमावली आहे. तर पुढची अडीच वर्षे टोलवसुली सुरूच राहणार असल्याने अंदाजे 700 कोटींची वरकमाई कंत्राटदार करणार असल्याची माहिती टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी दिली आहे. त्यामुळे त्वरीत एक्स्प्रेस वे वर टोलमुक्ती द्यावी अशी पुर्नमागणी वेलणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा