• एफ उत्तर विभाग कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
  • एफ उत्तर विभाग कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
SHARE

शीव - एफ उत्तर या विभागातील भाऊ दाजी मागार्वर असणाऱ्या पालिकेच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यालयाच्या गच्चीवर सकाळी पालिका सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस आणि पालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सलामी, परेड आणि भारत माता की जय या एकाच आवाजात भारताच्या तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर केशव उबाळे यांनी प्रजासत्ताक दिनाचं महत्व आणि देशाला अर्पण झालेली भारतीय राज्य घटना किती मोलाची आहे हे उपस्थितांना पटवून दिलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या